शौचासाठी गेलेल्या तरुणीवर अत्याचार दोन युवकांवर कातीने हल्ला
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीत ५ डिसेंबर रोजी मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली. गावालगतच्या झुडपी जंगलात दुपारी शौचासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीचा पिच्छा करत आरोपी किशोर मोरेश्वर रेपालकलवार (३५), रा. मानोरा, याने तिची छेड काढली आणि जबरदस्तीने झुडपात ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
आपबिती घरी सांगितल्यानंतर गावातील दोन युवक आरोपीला जाब विचारण्यासाठी गेले. मात्र संतापलेल्या आरोपीने कातीने त्यांच्यावर अचानक हल्ला करून दोघांना जखमी केले. आरोपी मेंढपाळ असून घटनेनंतर तो पसार होण्याचा प्रयत्न करत होता; परंतु पोलिसांनी अल्पावधीतच त्याला जेरबंद केले.बल्लारपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ६४(१), ७५(२), १२६(२), ११८(१) बीएनएस अंतर्गत गंभीर गुन्हा नोंदविला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे व पोहवा यशवंत कुमरे करत आहेत.
स्वच्छ भारत अभियान (स्वच्छ भारत अभियान) अंतर्गत, ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक घरात शौचालयांची सुविधा उपलब्ध व्हावी आणि उघड्यावर शौचास जाण्याची प्रथा बंद व्हावी यासाठी सरकार १२ हजार रुपये (शौचालय बांधकामासाठी) आर्थिक मदत देत आहे.
या उपक्रमाचे उद्दिष्ट देशातील स्वच्छता आणि आरोग्य सुधारणे आहे. त्याचप्रमाणे, जंगलांना लागून असलेले भाग वन्यजीव आणि इतर धोक्यांपासून संरक्षित आहेत. असे असूनही, अनेक ग्रामीण घरांमध्ये शौचालये नाहीत आणि त्यांना बाहेर शौचास जावे लागते.