दहेगाव गोसावी पोलीस ठाणे हद्दीत प्रतिबंधित नायलॉन मांजावर धडक कारवाई

Tue 16-Dec-2025,03:50 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा:दहेगाव गोसावी दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी दहेगाव गोसावी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजा हमदापूर येथील बाजार लाईन परिसरात छापा टाकून शासनाने प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत आरोपी नरेश वसंतराव चौधरी (वय १८), रा. हमदापूर, ता. सेलू, जि. वर्धा याच्या साधना जनरल अँड गिफ्ट सेंटरच्या मागील गोडाऊनमध्ये एका चुंगडीत लपवून ठेवलेला नायलॉन मांजा साठा आढळून आला. सदर नायलॉन मांजा मानवी तसेच पक्ष्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारा असून शासनाने त्यावर बंदी घातलेली आहे.

छाप्यात खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला :

1. हिरो प्लस कंपनीचे प्लास्टिकचे २ चक्री (हिरव्या व काळ्या रंगाचा नायलॉन मांजा) – प्रति चक्री ₹१००० प्रमाणे एकूण ₹३०००

2. मोनो के.टी.सी. फायटर कंपनीचे प्लास्टिकचे १ चक्री (ग्रे रंगाचा नायलॉन मांजा) – किंमत ₹१५००

अशा प्रकारे एकूण ₹४५०० किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा पंचनामा करून जप्त करण्यात आला.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे दहेगाव गोसावी, जि. वर्धा येथे अपराध क्रमांक ०३७९/२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २९२, २९३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ५ व १५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन,अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रल्हाद मदन ठाणेदार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार आनंद भरने, बम्हानंद मुन, पोलीस अंमलदार शंकर कोपरकर व अनिल चिलगर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.