निवडणूक निकालामुळे रविवार बाजारात बदल : बल्लारपूर नगर परिषदेची नागरिकांना सूचना

Fri 19-Dec-2025,08:59 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर:नगर परिषद बल्लारपूर सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहरातील दर आठवड्याला भरणाऱ्या रविवार बाजाराच्या दिवस बदल करण्यात आला आहे.

नगर परिषद प्रशासनाच्या निर्णयानुसार रविवारचा आठवडी बाजार २२ डिसेंबर २०२५ रोजी, सोमवारला भरविण्यात येणार आहे. त्यामुळे या आठवड्यात रविवारी बाजार न भरता तो एक दिवस उशिरा भरणार आहे.

या बदलामुळे व्यापारी, भाजीपाला विक्रेते, शेतकरी तसेच नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

बाजाराच्या बदललेल्या तारखेची माहिती सर्वांनी लक्षात घेऊन कोणतीही गैरसोय टाळावी, असेही कळविण्यात आले आहे.

सदर आदेश नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या आदेशानुसार निर्गमित करण्यात आला आहे.