ऐकावे ते नवलच,सीमेंट रोडचा लोहा बांधलेल्या रोडमधून गायब

Fri 19-Dec-2025,03:39 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लीपुर 

अल्लीपूर माजी सरपंच प्रभाकर फटिंग यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन- सात दिवसात रस्त्याला पडल्या महाभेगा

वर्धा:अल्लीपूर येथिल नागरी सुविधा अंतर्गत विविध रस्त्याचे काम सुरु असून,सदर कामासाठी वाळू ही मातीमिश्रित नाल्याची वापरत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाल मेघरे यांनी केला होता व तश्या लेखी तक्रारी सुद्धा संबधित विभागाकडे व ज्युनियर अभियंता उंबरे यांचे कडे केल्या होत्या मात्र अधिकाऱ्यांनी चौकशी करून चांगल्या दर्जाची वाळू वापरण्याचे निर्देश ठेकेदार माथणकर यांना दिले होते व गोपाल मेघरे यांना अश्या पद्धतीने आश्वासन सुद्धा दिले होते,परंतु असे न होता अल्लीपूर गावातील संपूर्ण रस्त्याचे कामे हे मातीमिश्रित वाळू मधेच करण्यात आलेली आहे,तर या सोबत भवानी वार्डातील अमोल बाकडे ते डॉ भलमे यांच्या प्लाट जवळील रोड मधे प्राकलानुसार लोखंडी सळाकीचे म्हणजेच लोह्याचे प्रायोजन होते परंतु सदर रस्त्यात कुठल्याही प्रकारचा लोहा वापरण्यात आलेला नाही,त्यासोबतच सदर रोडची जाडी सुद्धा अडीच ते तीन इंच करण्यात आली, त्यामुळे सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा गेलेल्या आहेत,या संदर्भात अल्लीपूर माजी सरपंच प्रभाकर फटिंग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत सदर रस्त्याची क्वालिटी कंट्रोल कमिटी यांचे मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे,वरिष्ठ अधिकारी खरोखर या प्रकरणात लक्ष घालतील की आपल्या ज्युनियर अधिकारी व ठेकेदारांची पाठराखण करतील याकडे मात्र गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.