ठाकूर सुशांतसिंह सरांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणघाटमध्ये ' वुशु' खेळाचा इतिहास
प्रतिनिधि:नदीम शेख हिंगणघाट
हिंगानघाट :क्रीडा भारती क्लब हिंगणघाट आणि द फायटर प्लॅनेट क्लबची खेळाडू जावेरिया सलीमोद्दीन शेख हिने राष्ट्रीय स्तरावर वुशु स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. ठाकूर सुशांत सिंह गहेरवार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या जावेरियाने श्रीनगर (जम्मू) येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय वुशु स्पर्धेत रजतपदक (Silver Medal) जिंकून महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे.
स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत, दिनांक २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२५ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, श्रीनगर येथे राष्ट्रीय शालेय वुशु स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हिंगणघाटच्या सतरा वर्षाखालील खेळाडू जावेरिया सलीमोद्दीन शेख हिने अतिशय जिद्दीने खेळ करत महाराष्ट्रासाठी हे बहुमूल्य यश संपादन केले.
या राष्ट्रीय स्पर्धेत जावेरियाने तीन बलवान विरोधकांना सहजपणे नमवले, तर उर्वरित दोन विरोधकांशी तिने अत्यंत कठीण संघर्ष करत आपला उत्कृष्ट खेळ दाखवला. तिच्या या सुंदर प्रदर्शनामुळे तिला राष्ट्रीय स्तरावर रजतपदक प्राप्त झाले. या विजयामुळे तिने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर नागपूर विभाग, वर्धा जिल्हा आणि विशेषतः हिंगणघाट तालुक्याचे नाव संपूर्ण भारतात गाजवले आहे.
शहरात परतल्यावर झाले शानदार स्वागत
हा ऐतिहासिक विजय मिळवून जावेरिया हिंगणघाटला परतल्यानंतर तिचे उत्स्फूर्त गौरवपूर्ण स्वागत करण्यात आले. हिंगणघाट शहराचे माजी समाजसेवक सुधीरबाबू कोठारी यांनी खेळाडू जावेरिया आणि तिचे प्रशिक्षक यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांनी जावेरियाला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
मिळालेल्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य वूशु संघ कोच तसेच वर्धा जिल्हा वूशु क्रीडा अध्यक्ष नीलेश राऊत सर तसेच क्रीडा शिक्षक ठाकुर सुशांत सिंह गहेरवार सर, परवेज खान सर, आशिष वांढ्रे,फैजान शेख ,निशांत येखंडे सर,कबीर महेशगौरी, आणि महिला कोच कु. नम्रता दुबे कु.रूपाली क्षिरसागर सर्व शिक्षक यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले.