कोटेश्वर येथे गणेश विसर्जनासाठी देवळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
कोटेश्वर येथे गणेश विसर्जनासाठी देवळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
खोल पाण्यात न जाता सुरक्षितपणे विसर्जन करण्याचे पोलिसांचे आवाहन
वर्धा : प्रतिनिधी इरशाद शहा
कोटेश्वर : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोटेश्वर येथे देवळी पोलीस ठाण्याच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.
गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांनी खोल पाण्यात जाऊ नये, पाण्यात उतरताना विशेष काळजी घ्यावी तसेच विसर्जनस्थळी स्वच्छता राखावी, असे आवाहन देवळी पोलिसांकडून करण्यात आले आहे. भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितपणे गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असेही पोलिसांनी सांगितले.
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच देवळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार एपीआय कापडे यांच्या आदेशानुसार हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तात पोलीस हवालदार विनोद कांबळे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी असून, कोटेश्वर प्रशासनाकडूनही आवश्यक सहकार्य केले जात आहे.