मराठी
_________________________
डोळे असतात पाणावलेले
तरीही हसावं लगत
येताच फौजीचा फोन
हृदय कस धडधडायला लागत
वाट बघते परत येण्याची
परत येणार की नाही हे पण माहिती नसत
आठवण येते फौजी तुमची फक्त तुम्हाला सांगावं वाटत…..
देशसेवेसाठी गेलेत याच कौतुक नेहमीच असत
आठवण येताच फौजिंची मन मात्र हरवल्यासारख वाटत
जवळ नसताना तुमचा भास होऊन जातो
आठवण येते फौजी तुमची फक्त तुम्हाला सांगावं वाटत…..
कस समजावं या वेड्या मनाला
फौजी हा पहिल्यांदा देशाचा असतो
खेळ हा जीवनाचा फौजिना असाच खेळायचा असतो
तुमच्या शिवाय मंन माझे कुठच रमत नसते
आठवण येते फौजी तुमची फक्त तुम्हाला सांगावं…..
लेखक : प्रिया, हिंगणघाट
Latest update ke liye HT News ko follow kare
Subscribe on Youtube
https://youtube.com/c/HTNEWSIND