तीर्थाटन टूर योजनेत महिला व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपूर
महाराष्ट्र सरकारने गेल्या दोन वर्षांपासून तीर्थाटन टुर योजना चालू केलेली आहे त्यात हिंगणघाट आगार प्रमुख जयंत सडमाके यांनी सुद्धा दर रविवारला अल्लिपूर येथे सदर योजना मागील दोन वर्षांपासून राबवित आहे त्यात अंबोरा धरण , शेगाव , शिर्डी , पंढरपूर , तुळजाभवानी, अक्कलकोट , महाराष्ट्रातील कुठेही अशा अनेक ठिकाणी दर रविवारला हिंगणघाट आगार प्रमुख यांच्यामार्फत अल्लिपूर येथून महिलांची अर्धी तिकीट पुरुषांची पूर्ण तिकीट व ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण मोफत तिकिट असल्यामुळे महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला असून सदर योजना त्यांच्या करीत आनंददायी ठरली आहे सदर योजना हिंगणघाट आगारतील ड्रायवर बाळू सिरसागर , सुशील पुंजे कंड्र्यावर सतिश मांडरे यांचे ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
प्रतिक्रिया
छाया बळवंत कापसे प्रवाशी
गेल्या दोन वर्षांपासून हिंगणघाट आगरातर्फे अल्लीपुरचे एस टी महामंडळाचे ड्रायवर बाळु सिरसागर सदर उपक्रम राबवित आहे दर रविवारला महाराष्ट्रातील कुठेही दर्शना करीता टुर नेतात सदर योजनेचा लाभ होतो ज्येष्ठ नागरिकांना तिर्थ दर्शन घडतात अशीच तीर्थ योजना नेहमी करीता चालु राहावी अशी अपेक्षा व्यक्त करते.
प्रवाशी माधव हिंगे
गेल्या दोन वर्षांपासून आमच्या अल्लीपुर गावातील व आजू बाजूच्या खेड्यातील ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना तीर्थ दर्शन योजनेचा लाभ मिळाला या सदर योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट माफ असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शनाचा लाभ मिळाला यामुळे आम्ही सर्व प्रवाशी हिंगणघाट आगार प्रमुख जयंत सडमाके यांचे अभिनंदन करतो व ही योजना अशीच चालु राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो