पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पथकाची दारुबंदी कायद्यान्वये धडक कारवाई
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा:हिंगणघाट दि 30.12.2025 रोजी पो स्टे हिंगणघाट पथकातील पोलीस स्टाफ, प्रविण बोधाने,स्वप्नील जिवने, सागर सामृतवार,प्रमोद डडमल यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की मौजा सावली वाघ येथील गोलु मन्ने हा त्याचे वाघसावली शिवारातील शेतात विनापास परवाना देशी दारू बाळगुन आहे अशा माहीती वरून मा.पोलीस निरीक्षक अनिल राउत (ठाणेदार पो स्टे हिंगणघाट) याचे निर्देशाप्रमाणे गोलु मन्ने यांचे मौजा वाघसावली येथील शेतामध्ये जावुन प्रोव्हीशन रेड केला असता आरोपी गोलु मन्ने यास पोलीस आल्याची चाहुल लागताच पसार झाला त्याचे शेताची पंचासमक्ष पाहणी केली असता शेतामध्ये एकुण 12 खर्ड्याचे खोक्यात देशी दारूने भरून असलेल्या 90 एम एल च्या एकुण 1200 प्लास्टीकच्या शिश्या,असा एकुण जु किं 1,20,000/रू चा मुद्दे माल मिळुण आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून नमुद आरोपीविरूध्द दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल सा.मा.अप्पर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे सा.मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक सा यांचे मार्गदर्शनात मा.पोलीस निरीक्षक अनिल राउत सा.याचे निर्देशाप्रमाणे, प्रविण बोधाने,स्वप्नील जिवने, सागर सामृतवार , प्रमोद डडमल यांनी केली .