प्राचीन मैदानी खेळ संकटांचा सामना करण्याचे धैर्य देतात : मोहन अग्रवाल
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा : भारतीय इतिहासात प्राचीन मैदानी खेळांना विशेष महत्त्व आहे. आधुनिक काळात हे खेळ हळूहळू लुप्त होत असताना त्यांचे जतन व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा खेळांमुळे शारीरिक व मानसिक विकास होतो, सामाजिक कौशल्ये वृद्धिंगत होतात, नेतृत्वगुण निर्माण होतात तसेच स्पर्धा व आव्हानांतून जीवनातील संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल यांनी केले.
ते दिनांक २७ डिसेंबर रोजी सिंचन सांस्कृतिक भवन येथे जिल्हा क्रीडा परिषद वर्धा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा आणि आष्टेडो आखाडा वर्धा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर संभागीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टेडो आखाडा फेडरेशन (भारत) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये आष्टेडो आखाडा फेडरेशनचे संस्थापक संचालक महागुरु राजेश तलमले, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, लायन्स क्लबचे अध्यक्ष निखिल रोकडे, माजी अध्यक्ष विजय सत्यम, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय सचिव किरण फुलझले, समाजसेवक अविनाश दुपारे, राजू लभाणे, आष्टेडो आखाडा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष उल्हास वाघ, जिल्हा संचालक मोहन मोहिते यांच्यासह संजय मिश्रा,शरद काठाणे, संदीप मिसाळ आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. या संभागीय शालेय स्पर्धेत सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
अध्यक्षीय भाषणात इमरान राही यांनी प्राचीन मैदानी खेळांमुळे ऊर्जा व उत्साह वाढतो, दैनंदिन जीवनातील कामे सुलभ होतात आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असे नमूद केले. हे खेळ शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महागुरु राजेश तलमले यांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाची प्रस्तावना उल्हास वाघ यांनी केली, संचालन अमोल मानकर यांनी तर आभार प्रदर्शन साहिल वाघ यांनी केले. स्पर्धा व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ऋषिकुमार सुपारे,धनश्री पडोळे,सचिन हुमने, जगदीश देशमुख,मोहन वकलकर, सागर नवधरे, नितिन पोटफोडे, वैभव तुडसकर, गौरव माकडे, वेदांत चौधरी, मिहिर वाघ, विक्रांत गव्हाणे,लीला वाघ,रेखा वाघ,शीतल लाजुरकर, प्रेम कवर, कैवल्य सागरकर, अरुण चवडे, सोहम विश्वकर्मा, नितिन यादव, सुनील पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.