तीर्थाटन टूर योजनेमुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

Sun 28-Dec-2025,11:13 PM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तीर्थाटन टूर योजनेचा लाभ महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मिळत असून वर्धा आगारातील बरबडी येथिल ज्येष्ठ नागरिक व महिला सुध्दा अल्लीपूर येथे येऊन सदर योजने चा लाभ घेतात हिंगणघाट आगाराचे प्रमुख जयंत सडमाके यांच्या मार्गदर्शनाखाली अल्लिपूर येथून दर रविवारी ही योजना सातत्याने राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत अंबोरा धरण, शेगाव, शिर्डी, पंढरपूर, तुळजाभवानी, अक्कलकोट तसेच महाराष्ट्रातील

विविध तीर्थक्षेत्रांना भेटी आयोजित केल्या जातात. महिलांसाठी अर्धे तिकीट, पुरुषांसाठी पूर्ण तिकीट तर ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ही तीर्थाटन योजना त्यांच्यासाठी आनंददायी ठरत आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी हिंगणघाट आगारातील चालक बाळू सिरसागर, विनोद राऊत

 व वाहक सतीश मांढरे यांचे महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया

प्रवासी माथुरे मॅडम शिक्षिका इंदिरा गांधी विद्यालय अल्लीपूर

गेल्या दोन वर्षापासून हिंगणघाट आगारामार्फत अल्लिपूर येथून एस.टी. महामंडळाचे चालक बाळू सिरसागर हा उपक्रम राबवत आहेत. दर रविवारी महाराष्ट्रातील विविध तीर्थस्थळांना दर्शनासाठी टुर काढण्यात येते. या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा लाभ होत असून ही तीर्थाटन योजना कायमस्वरूपी सुरू राहावी, अशी अपेक्षा आहे.

प्रवाशी आशा चिंचोलकर

गेल्या दोन वर्षांपासून अल्लिपूर व आजूबाजूच्या गावांतील ज्येष्ठ नागरिक व महिलांना या तीर्थदर्शन योजनेचा लाभ मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्ण तिकीट माफ असल्यामुळे त्यांना तीर्थदर्शन सहज शक्य झाले आहे. तसेच ज्या महिला आपल्या मुलांना तीर्थ दर्शनसाठी नेऊ शकत नव्हत्या त्या गरीब कुटुंबातील महिलांच्या मुलांना तीर्थदर्शन पहावयास मिळते या उपक्रमासाठी आम्ही सर्व प्रवाशी हिंगणघाट आगार प्रमुख जयंत सडमाके यांचे अभिनंदन करतो व ही योजना अशीच सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

दुर्गा दडांजे प्रवासी

आमच्या अल्लीपूरगावातून मागील दोन वर्षांपासून हिंगणघाट आगार प्रमुख जयंत सडमाके यांच्या नेतृत्वात अल्लीपूर येथिल चालक बाळू शिरसागर यांच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्रातील विविध तीर्थ दर्शन दाखवतात तचेच काल दिनांक २८ डिसेंबर रोजी सालबर्डी येथे टुर घेऊन गेले असता चालक बाळु शिरसागर यांच्या मुलगा विराज वय पाच वर्षे या मुलाचा वाढदिवस घरी न करता चालक बाळु शिरसागर यांनी दोन्ही एस टी महामंडळातील तीर्थ दर्शन येणाऱ्या ९० नागरिकांच्या उपस्थित वाढदिवस साजरा केला आम्हा सर्वांना केक , नाष्टा वाटप करण्यात आले सदर योजनेबद्दल आम्ही सर्व प्रवासी हिंगणघाट आगार प्रमुख जयंत सडमाके , चालक बाळु शिरसागर , चालक राऊत , यांचे अभिनंदन करते व ही तीर्थाटन योजना अशीच चालु राहावी अशी अपेक्षा हिंगणघाट आगार प्रमुख जयंत सडमाके यांना विनंती करते