कृषिपंपासाठी सोलरची सक्ती नकोच- महावितरण वीजपुरवठा पर्यायी ठेवा
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
तीन वर्षापासून सिंचन विहिरीचे अनुदान प्रलंबितच- शेतकऱ्यांनी निवेदन देत दिला सात दिवसाचा अल्टिमेटम.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवराया संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांसह मूख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
वर्धा:शेतकऱ्यांच्या वतीने मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीच्या प्रलंबित अनुदानासाठी व कृषी पंपासाठी केलेली सोलरची सक्ती रद्द करण्यासाठी व महावितरण मार्फत पर्यायी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी वर्धा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे ,या निवेदनातून शेतकऱ्यांनी निलज्ज सरकारच्या विरोधात अर्धनग्न होऊन आंदोलन करणाच्या देखील इशारा दिला आहे,
संपूर्ण वृत्त असे की तीन वर्षापूर्वी शासनाने मोठ्या प्रमाणात मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे वाटप केले होते व त्याचे अनुदान देखील लवकरात लवकर देण्याच्या प्रतिनिधी मार्फत जाहीर केले होते , बऱ्याच शेतकऱ्यांनी सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने या योजनेचा लाभ घेत विहिरीचे खोदकाम व बांधकाम व्याजाने पैसे आणत तर काही शेतकऱ्यांनी खासगी फायनान्सचे देखील कर्ज उचलून काम पूर्ण केले होते परंतु शासना कडून येणारे अनुदान पूर्ण थकून असल्याने कर्जावरील व्याजाचा बोजा मात्र वाढत असून सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडीत सापडला आहे,यावर्षी पीकपाणी सुद्धा कमी झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे अशात शेतकऱ्यांना सरकारने प्रलंबित असलेले अनुदान तात्काळ द्यावे त्यासोबतच कृषी पंपासाठी सोलरची सक्ती करण्यात आली आहे,एकीकडे राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी महावितरण कडे वीज पुरवठा घेण्यासाठी डिमांड भरली होती मात्र सरकारने जीएसटी कपात करून उर्वरित रक्कम डीडी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना वापस पाठविण्यात येत आहे,सोलरची दुरुस्ती करणारी यंत्रणा जिल्हात कार्यान्वित नाही,तर त्याला दुरुस्तीचा खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात लागतो आहे ,विजेमुळे व वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोलरचे होते आहे त्यामुळे सोलरची सक्ती न करता सोलरला पर्याय म्हणून महावितरण वीज पुरवठा सुरळीत ठेवावा या आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी वर्धा यांना देण्यात आले आहे,येत्या आठ दिवसांत यावर तोडगा न काढल्यास निर्लज्ज सरकार विरोधात अर्धनग्न आंदोलन करण्याच्या ईशारा यावेळी देण्यात आला आहे,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, प्रदेश उपाध्यक्ष संदिप कीटे,माजी सरपंच गजानन नरड,शिवसेनेचे नेते गोपाल मेघरे,प्रभाकर फटिंग राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रणय कदम,कार्याध्यक्ष सचिन पारसडे, शिवराया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन सेलकर ,विकास गोठे, रोशन नरड, मयुर डफ, वासुदेव कोडापे, उपसरपंच श्रीकांत मेंढे, गजानन चिंचोलकर, मयुर उगेमुगे, विलास अवचट,राहुल सुरकार ,अशोक सेलकर ,केशोर सेलकर,राजू अश्टणकर प्रफुल गोठे अजय नीमसडकर व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.