भिमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त वर्ध्यात भव्य रॅली व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधि युसूफ पठाण
वर्धा वर्धा भिमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयाला १ जानेवारी १८१८ रोजी पूर्ण झालेले शौर्य स्मरणार्थ व मानवंदना देण्यासाठी वर्धा येथील बुद्ध लॉन, नालवाडी येथे भव्य मोटारसायकल रॅलीचे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय बौद्ध महासभा, बुद्ध लॉन नालवाडी, संघदीप शैक्षणिक व सामाजिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडणार आहे. या उपक्रमांतर्गत १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा, सिव्हिल लाईन, वर्धा येथून मोटारसायकल रॅलीला सुरुवात होणार असून ती बुद्ध लॉन, नालवाडी येथे समारोप होणार आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बौद्ध बांधव, सामाजिक कार्यकर्ते, युवक, युवती तसेच महिला सहभागी होणार असल्याची माहिती आयोजक विशाल मानकर यांनी विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. दरम्यान, सायंकाळी ६ वाजता बुद्ध लॉन, नालवाडी येथे ‘जल्लोष शौर्यदिनाचा’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे आपल्या सादरीकरणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
भिमा कोरेगाव शौर्यदिन हा सामाजिक समतेचा, अन्यायाविरोधातील लढ्याचा आणि आत्मसन्मानाचा प्रतीक असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले. या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचवणे, सामाजिक जागृती निर्माण करणे आणि एकतेचा संदेश देणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक विशाल मानकर, धर्मदास मानकर, दिनेश धनवीज, प्रिती मानकर, वर्षा थुल, कॅप्टन संजय कांबळे, एडवोकेट ज्योती कोमलकर, नालंदा कांबळे, सुहास थुल, पचंशिला बोरकर, अर्चना नाखले, विशाखा गुजर, उज्वला मानकर, कॅप्टन रमेश ताजने, गौतम भगत, अरविंद भगत, धर्मपाल ताकसांडे, धर्मराज कळमकर, प्रकाश ताजने, रूपचंद जूनगडे, सुधाकर भगत, संजय माटे, गुणसागर कोथरे, राजा ढाले, निकोसे सर, अनंता भानसे, नीरज ताकसांडे , देवानंद बोरकर, अशोक बेताल, माधुरी सोनटक्के, सरजू सोमकुवर , प्रीती सोमकुवर यांच्यासह संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.