यशवंत हायस्कूल अल्लीपूर येथे दहावी १९९५ बॅचचा कौटुंबिक स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा:अल्लीपूर येथील यशवंत हायस्कूलमध्ये दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी दहावी १९९५ या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा कौटुंबिक स्नेह मिलन मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र कोठेकर यांनी भूषविले.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून मीरापूरकर सर, चव्हाण मॅडम, खाडे सर, मेश्राम मॅडम, घोडे मॅडम व समर्थ सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा ज्ञानेश्वर बोबडे यांनी केले, तर प्रास्ताविक श्रीराम वासुदेवराव साखरकर यांनी मांडले.
या स्नेह मेळाव्यास सुमारे ७० माजी विद्यार्थी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. गजानन नरड, गोपाल मेगरे, अरुण गिरडे, अरुण दरने, नितीन बाळबुधे, सुरज हिंगे, गजानन कापकर, वैशाली आखाडे, अर्चना कारवटकर, लता डहाके, वैशाली झिलपे, सुनिता धनजोडे, उज्वला कांबळे, प्रज्ञा गौळकर, सीमा घवघवे, जोगेश्वर खेळकर, वैकुंठ कारामोरे, अरविंद निबल, लोभीकृष्ण साखरकर, प्रदीप डफ, नरेश हलगे, सतीश पडोळे, सुनील बेले, सुनील घोडे, गजानन बेले, बबलू पठाण, हनीफ शेख यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली.
जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेह, आपुलकी व मैत्रीचा बंध अधिक दृढ करणारा हा माजी विद्यार्थी कौटुंबिक स्नेह मेळावा अत्यंत आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी संजय जयपूरकर यांनी आभार प्रदर्शन केले.