कंपनी विरोधात मजुराचा विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न
प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा
वरोरा:- शहरातील रहिवासी धनराज नानाजी गोचे वय ४७ वर्ष यांनी आज दिनांक 2 जानेवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला.धनराज नानाजी गोचे हा वरोरा येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या जी एम आर मॅको या कंपनीत 13 वर्षापासून कार्यरत होता सदर मधुर हा मजूर हा दोन तीन महिन्यापासून आजारी असल्याने तो कामावर जाऊ शकला नाही. कामावर रुजू होण्यासाठी गेला असता कंपनी अधिकारी धनराज यास मानसिकरित्या त्रास देत होते वारंवार विविध प्रकारच्या मेडिकल साठी मागणी करत असल्याने अखेर कंपनीच्या त्रासाला कंटाळून आज विष प्राशन केले याची माहिती गावातील सरपंच नंदलाल टेंभुर्डे जग्गू गोचे यांना कळतात यांनी त्या मधुराज मजुरास चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्या असून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अति दक्षता विभागात ठेवण्यात आलेले आहे.
Related News
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मद्यपान करून वाहन चालवू नका; वाहतूक नियम पाळण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन
3 days ago | Sajid Pathan