नगरपरिषदेची भाडेतत्त्वावरील जागा रिकामी करण्याचे आदेश

Thu 17-Sep-2026,06:47 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

 हिंगोली : वसमत शहरातील वसमत नगरपरिषदेच्या मालकीची व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आलेली जागा रिकामी करून नगरपरिषदेच्या ताब्यात देण्याचे आदेश संबंधित भाडेधारक संजय सर्जेराव काकडे यांना देण्यात आले आहेत.

यासंदर्भात नगरपरिषदेने दिलेल्या पत्रात त्यांच्या दिनांक २४ जानेवारी २०२२ रोजीच्या अर्जाचा तसेच नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या स्थायी निर्देश क्रमांक ३९ आणि जागा भाडेतत्त्वावर देताना करण्यात आलेल्या करारातील अटींचा संदर्भ देण्यात आला आहे.

जागा भाडेतत्त्वावर देताना निश्चित केलेल्या अटी व शर्तीतील मुद्दा क्रमांक २ नुसार, नगरपरिषदेला सदर जागेची आवश्यकता भासल्यास अनामत रक्कम परत करून जागा तात्काळ रिकामी करून घेण्याचा अधिकार नगरपरिषदेला आहे. तसेच, अशा वेळी कोणतीही नुकसानभरपाअट नमूद आहे.

सद्यस्थितीत नगरपरिषदेला सदर जागेची आवश्यकता असल्याने ती रिकामी करून निर्विवाद व प्रत्यक्ष ताबा नगरपरिषदेकडे देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जागा रिकामी करताना संबंधितांनी आपले साहित्य व इतर मालमत्ता स्वतःच्या जबाबदारीवर काढून जागा स्वच्छ व मोकळी करून द्यावी, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

नगरपरिषदेच्या अभिलेखानुसार जमा असलेली अनामत रक्कम नियमानुसार परत करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. मात्र, जागा रिकामी करून घेताना कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई अथवा व्यवसायातीलr नुकसानीची भरपाई नगरपरिषदेकडून देय राहणार नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सदर जागा तात्काळ रिकामी करून नगरपरिषदेच्या ताब्यात न दिल्यास, नगरपरिषदेस प्राप्त अधिकारांनुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही संबंधितांना देण्यात आला आहे.