अल्लीपूर पोलिसांची दमदार कारवाई; ९ गोवंशांची तस्करांच्या तावडीतून सुटका
१२ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; पहाटेच्या कारवाईने तस्करांमध्ये खळबळ
तालुका प्रतिनिधी – सुनील हिंगे, अल्लीपूर
अल्लीपूर पोलिसांनी गोवंश तस्करीविरोधात कारवाई करत ९ गोवंशांची तस्करांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी १२ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोवंश तस्करीबाबत अल्लीपूर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने नियोजन करून संशयित वाहनाच्या हालचालींवर लक्ष ठेवले. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला. पहाटेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत पोलिसांनी धाडसीपणे पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. त्यामधील ९ गोवंशांची सुखरूप सुटका करण्यात आली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ठाणेदार संगिता हेलोंडे, पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदुळकर, पोलीस हवालदार अजय रिठे, अजय वानखेडे, विठ्ठल शेद्रे, पोलीस अंमलदार पंकज कापसे, दिनेश खराबे तसेच होमगार्ड सैनिक दीपक मुजबेले यांनी कारवाईत सहभाग घेतला
.
अल्लीपूर पोलिसांचे कौतुक
पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे ९ गोवंशांचे प्राण वाचले असून गोवंश तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अल्लीपूर पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.