जीवरक्षक फाऊंडेशन ने राज्यपक्षी हरियल अजगर व तीन धामण जातीच्या सापांना दिले जीवदान
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपूर
अल्लीपुर:दि.06.11.2025 रोजी हिंगणघाट शहरातील बडोदा बँक लगत असलेल्या एका इमारतीला धडकून जखमी असलेल्या हरियल पक्ष्याची माहिती तिथल्या स्थानिक लोकांनी जीवरक्षक फाऊंडेशन ला दिली असता तिथे फाऊंडेशन रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली व हरीयल पक्षी सुरक्षितरित्या पकडून त्याचा जीवरक्षक फाऊंडेशन पशु वैद्यकीय यांच्या सल्ल्याने प्रथमोपचार करण्यात आला.
तसेच त्याच दिवशी शहरालगत असलेल्या सातेफळ रोड यशोदा सिड्स कंपनी शेजारी असलेल्या फरदे यांच्या शेतात असलेल्या शेतबंड्यात एकाच जागी 3 धामण साप दडून बसल्याची माहिती फरदे यांनी जीवरक्षक च्या रेस्क्यू टीम ला दिली घटनास्थळी राकेश झाडे टीमचे सदस्य सर्पमित्र भाविक कोपरकर व सर्पमित्र सागर शेंडे,हे पोहोचून तिथून तीन धामण जातीचे साप कुशलतेने पकडुन त्यांना जेरबंद केलें .धामण साप बिनविषारी असून त्याचे मुख्य खाद्य उंदीर, बेडूक , सरडे व झाडावरचे पक्षी आहेत असे झाडे यांनी सांगितले
तसेच शहरातील मोहता हायस्कूल हिंगणघाट च्या प्रवेशद्वारा लगत विशाल अजगर आढळून आला.ती माहिती मिळताच रेस्क्यू टीमचे सदस्य चेतनराव गावंडे यांनी अत्यंत शिताफीने तो अजगर जेरबंद केला .सदर साप हा 8 फूट लांबीचा असून शरीराने पूर्णपणे मजबूत असल्याचे निदर्शनात आले.
या घटनेची माहिती झाडे यांनी वनविभाग ला दिली असता वनकर्मचारी श्री योगेश पाटील, भाविक कोपरकर,ओम मेसरे, चेतन गावंडे, सागर यांच्या उपस्थितीत हे संपूर्ण वन्यजीव सुरक्षितपणे निसर्गाच्या सान्निध्यात आजंती येथे सोडण्यात आले आहे.