इंदिरानगर परिसरात गुन्हे शाखेची कारवाई : प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणारे दोन दुकानदार अटकेत; ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

Sat 13-Dec-2025,04:18 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील इंदिरानगर व राजीव गांधी नगर परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोन दुकानदारांवर स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरने धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ५० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित मांजा जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात पर्यावरण (संरक्षण) अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मनिष सुरेश राऊत (४७) रा. बॉम्ब प्लॉट, राजीव गांधी नगर या इसमाकडून २४ नग विविध रंगांच्या प्लास्टिक चक्रीवरील नायलॉन मांजा किंमत २४ हजार रुपये तर एकनाथ केशव चवरे (५२), रा.

बॉम्ब प्लॉट, इंदिरानगर याच्याकडून २६ नग चक्रीवरील मांजा किंमत २६ हजार रुपये असा एकूण ५० नग प्रतिबंधित मांजा जप्त करण्यात आला.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतिश अवथरे, पोहवा रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा दिपक डोंगरे, पोहवा इम्रान खान, पोअ किशोर वाकाटे, पोशि शशांक बदामवार, पोशि हिरालाल गुप्ता, मपोहवा छाया निकोडे यांनी केले.

प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे वाढणाऱ्या दुर्घटना आणि पर्यावरणीय धोका लक्षात घेता पोलिसांनी केलेली ही तत्पर कारवाई नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.