आमगाव :- आज दि 9 जुलाई शनिवारला दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान जोरदार पावसासह कडाक्याने विजेच्या गर्जना होत असताना आमगाव तालुक्यातील येरमडा या गावाच्या मधोमध असलेल्या हेतराम शरनागत यांच्या घरासमोर मोठ्या वडाच्या झाडाखाली म्हस बांधली होती वळाच्या झाडावर अचानक विज पडल्यामुळे या घटनेची माहिती स्थानिक साजाच्या तलाठ्याला दिली असता त्यांनी पंचनामा तयार करून तहसील कार्यालयात अहवाल सादर केला आहे त्या नुसार म्हशीची किंमत पचास हजार रुपये असे आकारण्यात आले आहे शेतकरी हेतराम शरनागत यांनी शासनाला नुकसान भरपाईची मागणी केली आहे.