पुलगाव पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गावठी मोहा दारूची रनिंग भट्टी उद्ध्वस्त

Sat 03-Jan-2026,06:33 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक

 

पुलगाव पुलगाव : दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पुलगाव पोलिसांनी मौजा वाघोली (बिरे) येथील शेतशिवारात, वर्धा नदीच्या काठावर सुरू असलेली अवैध गावठी मोहा दारूची रनिंग भट्टी उद्ध्वस्त केली. अतुल सवाडे (रा. बोरगाव वाघोली) हा इसम बेकायदेशीररीत्या मोहा दारूची भट्टी चालवत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी पुढील मुद्देमाल जप्त केला :

११ लोखंडी ड्रममध्ये साठवलेला मोहा सडवा रसायन – २,२०० लिटर (प्रति लिटर ₹१०० प्रमाणे) किंमत ₹२,२०,०००

दोन रनिंग भट्टीवरील ड्रममध्ये उकळता मोहा सडवा – ४०० लिटर (प्रति लिटर ₹१०० प्रमाणे) किंमत ₹४०,०००

दोन प्लास्टिक डबक्यांमध्ये गावठी मोहा दारू – ३० लिटर (प्रति लिटर ₹२०० प्रमाणे) किंमत ₹६,०००

१३ लोखंडी ड्रम (प्रति ड्रम ₹१,००० प्रमाणे) किंमत ₹१३,०००

दोन प्लास्टिक डबकी – किंमत ₹४००

इतर भट्टी साहित्य – किंमत ₹१,०००

असा एकूण ₹२,८०,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री. सौरव अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वंदना कारखेले यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस स्टेशन पुलगावचे ठाणेदार श्री. यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार विनोद रघाटाटे, कुणाल हिवसे तसेच पोलीस शिपाई सत्यप्रकाश काकण, उमेश बेले, संदीप बोरबन आणि गणेश इंगळे यांनी सहभाग घेतला.

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.