अल्लीपूर पोलिसांची धडक कारवाई दारूभट्टया केल्या उद्ध्वस्त
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:शनिवारी दिनांक ३ जानेवारी रोजी अल्लीपूर पोलिसांकडून अवैधरीत्या दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक मोहीम राबविली जात असताना ढोढरी शिवारात सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यावर छापा मारत गावठी दारूभट्टया उद्ध्वस्त करत तब्बल ४ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा गावठी मोहा रसायन सडवा व इतर मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. या कारवाईत शिल्प्या पवार रा.अल्लीपुर ढोढरी शिवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सौरभ अग्रवाल पोलिस अधिक्षक वर्धा,सदाशिव वाघमारे अपर पोलीस अधीक्षक वर्धा,डाॅ.वंदना कारखेले उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव यांच्या निर्देशानुसार सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार घुले ठाणेदार पोलीस स्टेशन अल्लीपूर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात , पोलिस उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर,पोलिस हवालदार अजय रिठे,अतुल लभाने,अजय वानखेडे, पोलीस अंमलदार आकाश कुक्कडकर आदींनी केली.
या धडक कारवाईमुळे दारु निर्मिती करण्यात व अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत अशीच मोहीम नेहमी चालू राहावी असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.