अखेर राष्ट्रवादी व शिवराया संघटनेच्या पाठपुराव्याला यश
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
अल्लीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थायी पदे भरली.
वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक वर्षापासून अनेक मुख्य पदे ही रिक्त होती,त्या अनुषंगाने मागील वर्षात अनेकदा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस (श.प.) व शिवराया संघटनेच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाला व लोकप्रतिनिधी यांना निवेदने देण्यात आली,याचाच पाठपुरावा आमचे नेते खासदार अमरजी काळे,माजी राज्यमंत्री रणजितदादा कांबळे व जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचे वतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आली होती, याचेच फळ म्हणून आज अल्लीपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्थायी वैद्यकीय अधिकारी डॉ.रुईकर तर फार्मासिस्ट म्हणून कु.गेडाम यांची स्थायी स्वरुपात नियुक्ती करण्यात आली,नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचे पुष्गुच्छ व सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक भेट देण्यात आले व
पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, त्यासोबतच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रभाकरजी नाईक यांचे सुद्धा आभार मानण्यात आले यावेळी माजी सरपंच गजाननजी नरड,माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसडे,शिवराया संघटनेचे अध्यक्ष नितीन सेलकर,रोषन नरड,श्रुणय ढगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.