अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगांना १०० टक्के अनुदानावर स्कुटी

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्यावतीने दिव्यांगासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत ५ टक्के दिव्यांग निधीतून या वर्षात वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थ्यांना स्कुटी पुरविण्यात येणार आहे. या योजनेचा दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली रसाळ यांनी केले आहे. सदर योजना १०० टक्के अनुदानावर राबविण्यात येणार असून यासाठी इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी संबंधित पंचायत समितीस्तरावर संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह दि. ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावा. अर्जसोबत वैश्विक ओळखपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र इत्यांदी कागपत्राची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर यांनी कळविले आहे.