शिक्षणाबरोबर खेळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक–इमरान राही”

नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा : वर्धा शिक्षणाबरोबरच खेळ हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. खेळामुळे आत्मविश्वास, सामाजिक कौशल्य, शिस्त, समस्या सोडवण्याची क्षमता यांचा विकास होतो. तसेच ताण कमी होऊन शिक्षण आनंददायी होते. त्यामुळे शालेय जीवनात खेळांचा समावेश होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही यांनी केले.ते 30 ऑगस्ट रोजी लॉन्स ट्रॅडिशनल कराटे-डो असोसिएशनतर्फे शहीद हुतात्मा स्मारक येथे आयोजित प्रमाणपत्र व बेल्ट वितरण सोहळा प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.या प्रसंगी सेंट थॉमस इंग्लिश शाळेच्या प्राचार्या प्रीती सत्यम, लॉयन्स क्लबचे माजी अध्यक्ष विजय सत्यम, आष्टीडू आखाडा असोसिएशनचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन मोहिते, लॉयन्स ट्रॅडिशनल कराटे-डो असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव कोशी उल्हास वाघ, सामाजिक कार्यकर्त्या कुमारी फिजा खान, फौजिया खान व लीला वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.कोशी उल्हास वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की खेळांमुळे मुलांचे शरीर मजबूत होते, सहनशक्ती वाढते आणि शारीरिक आरोग्य सुधारते. तसेच नेतृत्वगुण, टीमवर्क आणि शिस्त यांसारखी जीवनकौशल्ये विकसित होतात. यावेळी फौजिया खान, विजय सत्यम आणि प्राचार्या प्रीती सत्यम यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन मोहिते यांनी केले. संचालन सिहान सहिल वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन लीला वाघ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिहिर वाघ, प्रेम कंवर, केवल्य सागरकर, आर्यन छापेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.