अग्रवाल विज्ञान महाविद्यालयात तालुकास्तरीय समूह नृत्य स्पर्धा

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट गोंदिया द्वारा संचलित शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय सालेकसा येथे 28 ऑगस्ट 2025 रोजी तालुकास्तरीय समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली.दरवर्षीप्रमाणे महाविद्यालयामध्ये होत असलेल्या गणेशोत्सवा दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. सालेकसा तालुक्यातील आसपासच्या सर्व शाळा व महाविद्यालय यांना या स्पर्धेबाबत आधीच आमंत्रण देण्यात आलेले होते त्यानुसार शाळा व महाविद्यालय यामधून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ही स्पर्धा महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.ही स्पर्धा दोन गटात विभागून घेण्यात आली होती त्यापैकी वर्ग 9 ते वर्ग 12 हा एक गट आणि स्नातक व स्नातकोत्तर हा एक गट. यामधून 09 ते 12 या गटामध्ये प्रथम पारितोषिक एपीजे शाळा सालेकसा, द्वितीय पारितोषिक पंचशील शाळा मक्काटोला तर तृतीय पारितोषिक स्व शंकरलाल अग्रवाल कनिष्ठ महाविद्यालय सालेकसा व प्रोत्साहन पर पारितोषिक अभिनव विद्यामंदिर रोंढा यांना मिळाले. स्नातक व स्नातकोत्तर गटामधून प्रथम पारितोषिक जी के महिला महाविद्यालय कावराबांध द्वितीय शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय तर तृतीय पारितोषिक जी के महिला महाविद्यालय व प्रोत्साहनपर शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय यांना मिळाले. दोन्ही गटातील विजेत्या विद्यार्थ्यांना मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख पारितोषिके कार्यक्रमानंतर लगेच वितरित करण्यात आली. महाविद्यालयाकडून स्कूल कनेक्ट या उपक्रमातर्गत महाविद्यालयाच्या आसपासच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्यापैकी हा एक कार्यक्रम राबविण्यात आला. याच कालावधीत दि 29 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त या दिवशी सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ एस नारायण मूर्ती यांच्या नेतृत्वाखाली डॉ संजय बिरणवार,डॉ.पुनम ठाकूर,डॉ गिरीश देशमुख,डॉ.शिरीनाज सय्यद,प्रा.गौरी आडे व डॉ.संतोष पुरी यांनी रासेयो चमू व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने केले.