मुंडीपार येथील ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची फाईल पंचायत विभागात धुळखात

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-ग्रामविकास मंत्रालय मुंबई द्वारा गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत सालेकसा तालुक्यातील मुंडिपार पानगाँव गट ग्रामपंचायत मध्ये तत्कालीन ग्रामसेवक आर एम औरासे व परमेश्वर नेवारे व विद्यमान सरपंच चेतलाल हटिले यांनी 14 वा वित्त आयोग व 15 वा वित्त आयोग मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले असून सुद्धा आतापर्यंत कारवाई करण्यात आली नाही उलट अपरातपरी करणारे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे बोलले जात असून साधी,चौकशी सुद्धा गटविकास अधिकारी मार्फत व जिल्हा परिषद अंतर्गत चौकशी करण्यात आली नाही यात जिल्हा परिषद वरिष्ठ अधिकारीही भ्रष्टाचारात लिप्त असतील अशी चर्चा सध्या सुरू आहे व असा आरोपही ग्रामपंचायत सदस्य हरीश नागपुरे यांनी केला त्या अनुषंगाने 5 सप्टेंबर 2025रोजी शिक्षक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी उपोषण करणार आहेत. सदर ग्रामपंचायत मध्ये तत्कालीन ग्रामसेवक व विद्यमान सरपंच यांनी बोगस कामे करणे तसेच कामे न करताच बिल काढणे ग्रामपंचायत कडून दैनिक वृत्तपत्रात ई निविदा न देणे मर्जीतल्या लोकांना काम वाटप करणे यात विविध भ्रष्टाचारा मध्येही राजकारण असून भ्रष्टाचाराला पाठबळ देत शासकीय कर्मचारी याला जबाबदार असल्याचा आरोप नागपूरे यांनी केला आहे तत्कालीन ग्रामसेवक यांना देवरी, मोरगाव अर्जुनी येथे बदली करून मोकळे झाले आहेत सदर 5सप्टेंबर रोजी साखळी उपोषण करिता तहसीलदार गटविकास अधिकारी व ठाणेदार जिल्हा,परिषद सदस्य सभापती उपसभापती पंचायत समिती सदस्य यानाही पत्रव्यवहार केला आहे मात्र या संदर्भात अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.