जि.प.शाळेचे आदर्श शिक्षक राजेंद्र पांडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

प्रतिनिधी दिनेश डहाके पुसला
आमदार उमेश (चंदु) यावलकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती
वरूड:वरूड तालुक्यातील टेम्भूरखेडा येथील राहिवासी असलेले आदर्श शिक्षक राजेंद्र पांडे हे मोठी भेंमडी येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांचा शनिवार दि.३० ऑगस्ट रोजी गव्हाणकुंड येथील शेकदरी तलाव परिसरातील बागेत सेवा निवृत्ती सत्कार सोहळा पार पडला. या सत्कार सोहळ्यावेळी आ.चंदु उर्फ उमेश यावलकर यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, ग्राम टेंभुरखेडा केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक-शिक्षिका व मोठी भेंबडी शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थितांनी राजेंद्र पांडे यांच्या जीवन चरित्र्यावर प्रकाश टाकत त्यांचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या आयुष्यातील उर्वरित वर्ष ही आनंदीमय, सुख समृद्धीची व निरोगी जावो अशी सर्वांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली. पांडे यांचा अतिशय गरीब कुटुंबात जन्म झाला असुन त्यांनी स्व-मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण केले व जिल्हा परिषद शाळेवर नियुक्त झाले. त्यांनी आपल्या कालखंडात शाळेची सुद्धा प्रगतीकडे वाटचाल केली. त्यांचे शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर इतरही क्षेत्रांमध्ये भरभरून योगदान आहे अशी माहिती त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला गावातील जेष्ठ मंडळी, तरुण मित्रमंडळी, त्यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते.