घाटटेमणी वरून चालतो सालेकसा तालुक्यासह 104 गावाचा पशुवैद्यकीय दवाखान्याचा अतिरिक्त कार्यभार

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत नागपूर उपराजधानी मार्फत गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्या त गेल्या दोन ते तीन वर्षापासून अनेक समस्यांचे माहेरघर असून पशुवैद्यकीय अधिकारी यांची बदली सध्या आमगाव तालुक्यातील दवाखान्यात पशुवैद्यकीय दवाखान्यात झाली आहे मात्र गेल्या दोन महिन्यापासून घाट टेमणी अतिरिक्त कार्यभार सुरू असल्याने सालेकसा तालुका हा तालुका चे ठिकाण असून सुद्धा कायमस्वरूपी पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर आहे येथील पशुवैद्यकीय अधिकारी हे व त्यांच्या अधिनस्त असलेले कर्मचारी सुद्धा मुख्यालयात राहत नाही पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पशु लसीकरण गृहभेटी व सालेकसा तालुक्यातील अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात अधिकारी वेळेवर सेवा देत नाही दवाखान्यात उशिरा येणे व वेळेच्या हात पशु वैद्यकीय दवाखान्यातून निघून जाणे ही त्यांची सवय झालेली आहे अनेक योजना पासून नाही पशुपालक हे आजही वंचित आहेत सालेकसा तालुका हा आदिवासी असून बऱ्याच योजना पासूनही शेतकरी बळीराजा आपल्या शेतीच्या भरोशावर कसेबसे तरी पोट भरत असते यात मोठे उद्योग नसल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे सालेकसा तालुक्यात 40 ग्रामपंचायत व 92 गावाचा समावेश आहे विशेष बाब म्हणजे शासनाकडून सन 2023, 2024 या आर्थिक वर्षात मराठवाडा योजना नाविन्यपूर्ण योजना अमलात आणले होते व प्रत्येकी एका निवडझालेल्या लाभार्थ्यांना एक दोन म्हैस त्याची किंमत शासन स्तरावर 60,000 हजार असे दोन म्हैस मिळून एक लाख वीस हजार रुपयाची योजना होती परंतु त्या मंजूर योजनेचे लाभार्थ्यांना कसल्याही प्रकारे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लाभ दिला नाही घाटटेमनी वरून सालेकसा तालुक्याच् ठिकाणी व तालुक्याच्या बाहेर असलेले गाव अंदाजे 60 ते 70 किलोमीटर अंतरावर दूर असताना देखील ते संध्याकाळी देऊ शकत नाही यामध्ये त्यांच्या बैठका ऑनलाईन मीटिंग मासिक अहवाल व असे विविध कामेही त्यांना येत असतात आधीच महाराष्ट्र शासनाने पाच दिवसाचा आठवडा केल्याने शेतकऱ्यांना वैद्यकीय अधिकारी वेळ देत नाही आणि पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी हे बाहेरून अपडाऊन करत आहेत. त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणे गरजेचे आहे शासन निर्णय प्रमाणे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहावे असे तरतूद आहे पण मुख्यालई राहत नाही व घर भाडे खोटे प्रमाणपत्र जोडून घेत आहेत यात शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे.सालेकसा तालुक्यात पिपरीया, कावराबांध, विचारपूर,पांढरवानी, सालेकसा कोटरा, साखरीटोला यासोबत देखील श्रेणी क्रमांक दोन दवाखान्यांचा समावेश याच तालुक्यात आहे. संबंधित सालेकसा येथे कायमस्वरूपी पशु वैद्यकीय अधिकारी,याची नियुक्त करण्यात यावा व संपूर्ण मराठवाडा योजनांची पूर्णपणे मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.ही आहेत घाटटेमनी अंतर्गत येणारी गावे बनियाटोला,जंगीटोला, मोहरानटोला,नागोटोला, मशीनटोला तर गिरोला, टाकरी,टेकरी,बोदा,पोकरटोला,घाटटेमनी ही गावी पशुवैद्यकीय श्रेणी एक मध्ये येत आहेत तर सालेकसा तालुक्यातील 92 गावाचा समावेश असून असे एकूण 104 गावे अतिरिक्त पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यावर कार्यभार आहे.
प्रतिक्रिया
या संदर्भात प्रत्यक्षात अधिक माहिती घेतली असता पशुवैद्यकीय अधिकारी हे पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये नेहमी गैरहजर राहत असून त्यांची बदली गेल्या दोन महिन्यापूर्वी आमगाव तालुक्यातील घाट चिमणी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी क्रमांक 1 येथे झाली आहे तसा अहवाल पंचायत समितीमार्फत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी गोंदिया यांना पाठवले व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी हे नेहमीच राजकारण करीत असल्याची चर्चा असून उडवाउडीचे उत्तर देत आहेत त्यामुळे सालेकसा पंचायत समिती मधून त्वरित त्यांना हटविण्यात यावे असा ठरावही पंचायत समितीच्या मासिक सभेत घेतला आहे.
जितेंद्र बल्हारे उपसभापती पंचायत समिती सालेकसा
प्रतिक्रिया
या संदर्भात अधिक माहिती घेतली असता पशुवैद्यकीय अधिकारी हे पंचायत समितीच्या मासिक मिटींगला येत नाही ही बाब सत्य आहे व नेहमी प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या व्यक्तीला पाठवत असून त्यांची बदली होऊन दोन महिने झाले परंतु आतापर्यंत त्यांना घाट टेमनी करिता कार्यमुक्त केले नाही ज्या शासनाच्या विविध योजना असेल त्या संबंधित लाभार्थ्यांना वेळेवर मिळावे व कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी सालेकसाला देखील देण्यात यावा डॉक्टर कोकोडे यांना सोडण्यात यावे असा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला आहे.
अर्चना मडावी सदस्य पंचायत समिती सालेकसा
प्रतिक्रिया
यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क केला असता ते कधीच पत्रकारांचे फोन उचलत नाही व कार्यालयात गेल्यावरही मीटिंगमध्ये आहे आता या थोड्यावेळाने या उद्या या असे टाळाटाळ उत्तर नेहमी देत असतात.