सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

Sun 31-Aug-2025,10:18 PM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील कानगाव येथील युवकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना ३० ऑगस्ट रोजी घडली. कानगाव येथील प्रतीक गजानन बुकने (वय २३) यास ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री राहत्या घरी झोपेत सर्पदंश झाला. चावल्याचा भास झाल्याने प्रतीक भावाला घेऊन शासकीय रुग्णालयात गेला. तेथून सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात आले. सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रतीकच्या मृत्यूमुळे कानगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.