रामनगर पोलीस स्टेशनचे सहायक फौंजदार सुभाष शिडाम यांचे निधन

Fri 29-Aug-2025,02:30 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर :- पोलीस स्टेशन रामनगर येथील गोपनीय शाखा येथे नियुक्तीस असलेले सहाय्यक फौजदार तसेच बल्लारपूर पोलीस स्टेशनला गुप्त विभागात सक्रिय पणे आपले कर्तव्य बजाविलेले श्री सुभाष वसंतराव सिडाम वय 56 वर्ष बक्कल नंबर 1887 यांचे आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 04/00 वाजता न्यू इरा हॉस्पिटल नागपूर येथे उपचारादरम्यान हृदयविकाराने झटका आल्याने निधन झाले असल्याचे वृत्त प्राप्त होत असून सूत्रांच्या माहिती नुसार मागील आठवड्यात मूल मार्गांवर त्यांचा अपघात घडल्याची माहिती असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु होते व या दरम्यान ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे पहाटे 4:00 वाजता निधन झाले.