गाडेगाव-कानगाव रस्ता धोकादायक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Tue 02-Sep-2025,08:25 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील कानगाव ते गाडेगाव या पाच किमी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे।. वर्धा एसटी महामंडळाकडून बससेवा बंद करण्यात आल्याने वर्ग ५ ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या स्त्यावर नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. मात्र रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधीं कडून दुर्लक्ष असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.कानगाव ते गाडेगाव या रस्त्यावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहे. पावसाळ्यात खड्यात पाणी साचत असल्यामुळे वाहनचालकांना खड्डे दिसत नाही. परिणामी वाहनचालकांचे अपघात होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी अनेकवेळी लोकप्रतिनिधींना निवेदन दिली. मात्र, अजूनपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही.

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

कानगाव ते गाडेगाव रस्त्यावर जीवघेणे खड़े पडले आहे. परिणामी वर्धा आगारातून येणारी बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी त्वरित लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा याच रस्त्यावर बसून आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.नागरिकांना रस्त्याच्या खड्यातून प्रवास करावा लागतो. पालकांकडून रस्ता दुरुस्त करून बससेवा पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी आमदार राजेश बकाने यांच्याकडे निवेदनातून केली आहे.कानगाव ते गाडेगाव या रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्याने आरोग्यसेवा कोलमडली आहे.रुग्णांना दवाखान्यात जाणे कठीण झाले असुन रुग्णवाहिकासूद्धा येण्यास तयार होत नाही.