राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवराया संघटनेचे नायब तहसिलदार हिंगणघाट यांना दिले निवेदन
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव हाते व येरनवाडी शिवारातील ऑनलाइन ई पिक नोंदणी करताना शिवारातील शेताचे लोकेशन येत नसून दुसरीकडे येत असल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे.ई पीक विम्याकरीता किवा पिक कर्ज घेण्याच्या दृष्टीकोनातून ई पीक पाहणी महत्वाची असल्याने सदर अडचणी दूर करण्यासंदर्भात 4 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व शिवराया संघटना यांचे वतीने नायब तहसीलदार श्री.भलावी साहेब यांना निवेदन देण्यात आले,यावेळी स्थानिक शिवारातील शेतकरी सूनील बेले , गुड्डू फटिंग , मधुकर भलमे , रामा बालपांडे , जील्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस वर्धा सचिन पारसडे , संस्थापक शिवराया संघटणा नितीन सेलकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते
Related News
नगरपरिषद निवडणुकीतील गंभीर गैरव्यवस्थेबाबत आप ची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे तातडीच्या चौकशीची मागणी
05-Dec-2025 | Sajid Pathan
दिल्लीमध्ये अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक लवकरच.
01-Dec-2025 | Sajid Pathan
गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस–शिवसेना (उबाठा)–वंचित आघाडीची युती जाहीर
09-Nov-2025 | Sajid Pathan