वर्धा जिल्ह्यात ‘वोट चोर मोदी सरकार’ निषेधार्थ भव्य स्वाक्षरी मोहीम व बाईक रॅली आयोजित

Thu 04-Sep-2025,03:37 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा:4 सप्टेंबर 2025 आज वर्धा जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने “वोट चोर मोदी सरकारचा” निषेधार्थ भव्य स्वाक्षरी मोहीम व बाईक रॅली आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी केले.

कार्यक्रमात उपस्थित होते:माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे,शैलेश अग्रवाल, सुधीर पांगुळ,महिला काँग्रेस कमिटीच्या मनीषा मेघे, अर्चना भोम्बले, अरुणा धोटे अनुसूचित जाती सेलचे धर्मपाल ताकसांडे आदिवासी सेल, युवक काँग्रेसचे अंकुश मुंजेवर, पराग पिंपळेNUCI काँग्रेस, कामगार काँग्रेस सेलचे अक्रम पठाण तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्तेकार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी सक्रिय सहभाग घेत मोदी सरकारच्या धोरणांवर निषेध व्यक्त केला. रॅलीत सहभागी लोकांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोहीमेचा प्रचार केला, ज्यामुळे नागरिकांना जागरूक करून मतदानाचा योग्य वापर करण्यास प्रवृत्त केले.काँग्रेसच्या या उपक्रमामुळे स्थानीय तसेच राज्यस्तरीय धोरणांबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश साध्य झाला, असे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी सांगितले.

टीप: ही मोहीम काँग्रेसकडून नागरिकांमध्ये सक्रिय सहभाग वाढवण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न मानला जात आहे.