एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी दिली पिपरिया ग्रा.प. ला भेट

Fri 29-Aug-2025,01:52 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी ग्रामपंचायतीला दिनांक 20 ऑगस्ट 2025 बुधवार रोजी भेट देऊन येथील मूलभूत समस्यांच्या आढावा घेतला व आदिवासी विकास विभागामार्फत येथील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. विशेष करून पिपरिया येथील शिक्षण,आरोग्य व सिंचनावर भर देण्याची मागणी येथील उपसरपंच गुणाराम बुधरामजी मेहर यांनी केली.याप्रसंगी ग्रा. प. सदस्य राजाराम धामडे,अशोक उईके, माजी ग्रा.प. सदस्य रामेश्वर लिल्हारे, दुलीचंद दसरिया,आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे संचालक हरिलाल कुंभरे,मोहन पुंगडे, कमल उपराडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.