कुरखेडा येथे परमात्मा एक सेवक मंडळाची चर्चा बैठक पार पडली

Thu 28-Aug-2025,08:15 PM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली

कुरखेडा : परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर यांच्या वतीने मानवधर्म जनजागृती, प्रचार व प्रसार,अंधश्रद्धा निर्मूलन, वाईट व्यसनमुक्ती तसेच दारूबंदी अभियान या महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.ही बैठक मंडळाच्या नवव्या हवन कार्याच्या निमित्ताने कुरखेडा येथे पार पडली. या वेळी आमदार रामदास मसराम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, समाजातील अंधश्रद्धा दूर करून शिक्षण, जागृती आणि व्यसनमुक्त जीवनशैली अंगीकारणे ही काळाची गरज आहे. युवकांनी दारूबंदी अभियान प्रभावीपणे राबवावे आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन या उपक्रमांना पाठिंबा द्यावा, असे त्यांनी आवाहन केले.बैठकीत उपस्थित: काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, जयंत हरडे, माजी सभापती गिरीधर तीतराम, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष कमलेश बारस्कर युवक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा प्रांजल धाबेकर, सागर वाढई,यादवराव पराते चंद्रपूर, संजय चाचारे सर, महेश बिजलेकर, जगदीश कुंभारे, मुकुंदा औसारे , हेमराज कुवर, घुलीचंद गिरीपुंज, संजय ठुसे, दयाराम मेश्राम, अंकुश चोपकार,कार्तिक टिकले, गणपत म्हशाखेत्री,दादाजी पोवरे, रामभाऊ बोरकर, कन्हैया तांडेकर, पुरुषोत्तम मेश्राम,रवी लांजेवार,सुखदेव शहारे, तसेच मंडळाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.