सालेकसा येथे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते मृतक टिकेशचंद्र शंकरलाल मडावी यांच्या पत्नीला 4 लाख रुपयांचा धनादेश वितरित

Fri 29-Aug-2025,04:34 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधि गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा-सालेकसा तहसील अंतर्गत आमगाव–देवरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजय पुराम यांच्या हस्ते आज सालेकसा तहसील कार्यालयात शासनामार्फत घोषित करण्यात आलेल्या आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.गत महिन्यात दरेकसा परिसरात आलेल्या पूरपरिस्थितीत स्व. टिकेशचंद्र शंकरलाल मडावी यांची दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी व कुटुंबियांचे आयुष्य अंधारात गेले. शासनाने याची गंभीर दखल घेत त्यांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली होती.ही आर्थिक मदत आज दुपारी 12 वाजता सालेकसा येथील तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार संजय पुराम यांच्या हस्ते स्व. मडावी यांच्या पत्नी दर्शना मडवी यांना सुपूर्द करण्यात आली.कार्यक्रमास तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.या प्रसंगी आमदार पुराम म्हणाले, "कुटुंबाचा आधार गमावलेल्यांना अशा वेळी शासनाची मदत अत्यंत आवश्यक असते. ही मदत त्यांच्या पुढील आयुष्यात थोडासा दिलासा देईल, अशी आशा आहे."कार्यक्रम शांततेत व सुसंगठित पद्धतीने पार पडला. उपस्थित कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.