अल्लीपूर पोलिसांची जुगारावर धाड 9 लाख 92 हजाराचा मुद्द्येमाल जप्त

तालुका प्रतिनिधि सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील शेकापुर मोझरी परीसरात चार सप्टेंबर गुरुवार रोजी पांडुरंग भगत यांच्या घरी लाखोचा जुगार खेळत असताना सहा जणांना अटक करुन त्यांची वाहने सुद्धा जप्त करण्यात आली. सदर कारवाई दबंग उपवीभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विजय कुमार घुले , जमादार राहुल नव्हाते , पोलीस हवालदार सुनिल बेले , अनुप नाईक यांनी केली. या कारवाईमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 4 सप्टेंबर रोजी शेकापुर मोझरी येथील पांडुरंग भगत यांच्या राहत्या घरी हजारोंचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना एका विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. पोलिसांनी सापळा रचून शेकापूर मोझरी येथील पांडुरंग भगत याच्या घरी पोलीस निरीक्षक विजय कुमार घुले व पोलीस पथकांनी छापा मारला. यावेळी सहाजण ताश पत्त्यांवर जुगार खेळताना आढळले व त्यांना तात्काळ अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्या मध्ये आरोपी पांडुरंग भगत , मंगेश परचाके , प्रशांत आगलावे , राजू भोयर , हर्षद सातपुते रा. शेकापूर मोझरी या सर्व आरोपींचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोबाईल ,एक कार तीन दुचाकीसह 9 लाख 92हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास अल्लीपूर पोलिस करत आहे.