ब्रम्हपुरी ची खेळाडू कु.गोजिरी हेमकृष्ण दोनाडकर हिने राज्यस्तरीय अथलेटिक स्पर्धेत पटकविले सुवर्णपदक

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:-दिनांक २/९/२०२५ ला महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन द्वारा पुणे येथील शिवछत्रपती क्रीडानगरी,बालेवाडी येथे राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेच्या १४ वर्षा आतील मुलींच्या गटात ट्रायथलाँन बी क्रीडा प्रकारात ज्यामध्ये ( ६०मीटर स्प्रिंटिंग रनींग, लांब उडी व बॅक थ्रो मध्ये एकूण २५५८ गुण ) मिळवून उत्कृष्ट प्रदर्शन करत पी.आर.डी. स्पोर्ट्स ब्रह्मपुरी ची विद्यार्थिनी कुमारी.गोजिरी हेमकृष्ण दोनाडकर हीने सुवर्णपदक पटकावले त्याबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतून होत आहे कुमारी.गोजिरी हेमकृष्ण दोनाडकर हीने आपल्या विजयाचे श्रेय पालक व चंद्रपूर जिल्ह्या ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव मा.सुरेश अडपेवार सर, टीम मॅनेजर व सर्व पदाधिकारी यांना दिले कुमारी.गोजिरी हेमकृष्ण दोनाडकर ही मागील २ वर्षापासून पी.आर.डी.स्पोर्ट्स ब्रह्मपुरी चे संचालक राहुल जुआरे सर यांच्या मार्गदर्शनात सराव करत आहे.