मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नानव्हा येथे गावस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

Thu 18-Sep-2025,01:34 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा 

सालेकसा -गाव समृद्ध झाले तरच राज्याचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तालुक्यातील प्रत्येक गावात यशस्वीरित्या राबवून आपली तालुका जिल्हा राज्यात अभियानात अग्रेसर राहील,.यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी संजय पुरी यांनी केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावस्तरीय कार्यशाळा ग्रामपंचायत नानव्हा येथे उत्साहात पार पडली. . या प्रसंगी जिल्हा परिषद गोंदिया चे शिक्षण अधिकार सुधीर महामूनी पंचायत विस्तार अधिकारी अरूण कोसमे, आरोग्य सेवक चौधरी सर ,सरपंच गौरीशंकर बिसेन, ग्रामविकास अधिकारी शिवाजी राठोड, माविन संयोजिका छाया मोटघरे,उपसरपंच भाग्यश्वरी कटरे, ग्रामपंचायत सदस्य उर्मिला भंडारी, अशोक कटरे, मुन्नीबाई ठाकरे,विजय शरणागत, प्रशांत टेभुर्णीकर, सोमेश्वर वरखडे,सुनिता भोंडे,उषा हरीणखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी गावांचा विकास होण्याच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे. या अभियानात सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा विकास शक्य असल्याचे मत शिक्षणाधिकारी सुधीर महामूनी यांनी केले

सरपंच गौरीशंकर बिसेन म्हणाले, प्रत्येक गावाला वीज, पाणी, शिक्षण, रस्ते यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पंचायतराज व्यवस्थेमार्फत केले जाते. विविध अभियान व योजनांच्या माध्यमातून गावच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावाच्या विकासाची मोठी संधी मिळाली आहे. या संधीचं सोने करत आपले गाव समृद्ध करण्यासाठी अभियानात हिरिरीने सहभाग नोंदवावा.

कार्यशाळेचे पुर्वी शालेय विद्यार्थ्यांनी गावात रैली काडुन अभियानाची जनजागृती करण्यात आली.या प्रसंगी ग्रामपंचायत सभासदांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यशाळेत महिला बचत गट , सामुहिक वन हक्क समिती, तंमुस गाव समिती,वन‌ संरक्षण समिती शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम विकास समिती,शिक्षकवृंद, अंगणवाडी कर्मचारी व गावकरी ‌खुब उत्साहने सहभागी झाले.कार्यक्रमाची प्रस्तावित ग्रामविकास अधिकारी शिवाजी राठोड नी मांडली, संचालक मुख्याध्यापक पुरन नागपुरे तर आभार सामाजिक कार्यकर्ता राजेश कटरे ने केली.कार्यक्रमाला यशस्वी रित्या पार पडल्या करीता परिचर देवेंद्र शेन्डे, राकेश भंडारी, मंगेश पटले रोजगार सेवक खेमराज बिसेन कार्य केले.