पुरामध्ये अडकलेले लोक सुखरूप काढले बाहेर

Sun 14-Sep-2025,12:13 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. भोजनखेडा बोडखी नाल्यालगत गावातील शेतकरी व मजूर नाल्याच्या पाण्यात अडकले होते. अल्लीपूर येथील ठाणेदार विजयकुमार घुले, वर्धा येथील तहसीलदार योगेश शिंदे आणि उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांना माहिती देण्यात आली. माजी सरपंच नितीन चंदनखेडे, निखिल कातोरे,दर्शन कलोडे यांच्यासह काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मध्यरात्री एक वाजता पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकरी, मजुरांना आणि ९५ बकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. गावातील नागरिकांनी ठाणेदार विजय कुमार घुले व माजी सरपंच नितीन चांदणखेडे,निखील कातोरे,दर्शन कलोडे यांचे आभार व्यक्त केले.