शिक्षक हेच विद्यार्थ्यांच्या जीवनाचे शिल्पकार – यशवंत महाविद्यालयात शिक्षक दिनाचे आयोजन

Sat 13-Sep-2025,07:40 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपदाक 

 

वर्धा ( वर्धा ) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त यशवंत महाविद्यालयात शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षकांच्या महत्त्वाची आणि त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणाऱ्या प्रभावाची ओळख पटविण्यात आली.

कार्यक्रमात प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे, सांस्कृतिक समिती समन्वयक डॉ. संजय धोटे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र बेले, आणि स्वयंशासन कार्यक्रमाच्या प्राचार्या कोमल वराडे उपस्थित होत्या.

प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे यांनी अध्यक्षीय मनोगतात शिक्षकांचे कार्य जीवनाला कलाटणी देणारे असल्याचे सांगितले. शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, प्रेरणा देतात, शिकवतात, पण त्या मार्गावर प्रामाणिकपणे चालण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असते. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची नाती द्विपक्षीय असून, शिक्षक हेच विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार आहेत.

डॉ. रवींद्र बेले यांनी सांगितले की, शिक्षकांचे कार्य कुंभारासारखे असते. जसे कुंभार ओल्या मातीला घडवतो, तसेच शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात संस्कार घडवतात, व्यक्तिमत्व विकसित करतात आणि विशिष्ट गुणांची रुजवात करतात.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून भूमिका पार पाडली, तसेच सर्व गुरुजनांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. विद्यार्थ्यांमध्ये राज गुजर, प्रियांशु गौतम, राखी राठोड यांनी शिक्षकांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय धोटे यांनी केले, सूत्रसंचालन ओम मोहरले व मृणाली काकडे, आणि आभार प्रदर्शन नाजमीन नावेद पठाण यांनी केले.

कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले.