उडान अकॅडमी कट्टीपार तर्फे गुणवंतांचा सत्कार

Thu 21-Aug-2025,09:11 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव

आमगाव : कट्टीपार येथील उडान अकॅडमी कट्टीपार तर्फे स्वातंत्र्य दिवसानिमित्य गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सीआरपीफचे जवान शुभम चुटे,ध्वजपुजक स्वाती हितेश शहारे,प्रमुख पाहुणे म्हणून ज्योतिष कठाने,सुरेश परिहार, राधेश्याम हरिणखेडे मुख्य मार्गदर्शक धर्मादाय अधिकारी तोषिक मूनेश्वर उपस्थित होते.या वेळी पोलीस शिपाई पदावरून अधिकारी कसे तयार होतायेइल या विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गुणवंत विध्यार्त्यांचे सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन हितेश शहारे,युवराज मुनेश्वर व आभार प्रदर्शन हर्ष खोटेले यांनी मानले.