खुरसापार शिवारातील शेतकरी भयभीत वनविभागाच्या ऑफिसमध्ये केला तीन तास ठिय्या आंदोलन,

Fri 12-Sep-2025,07:23 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :विलास लभाने (गिरड )

गिरड: गिरड खुर्सापार शेत शिवारात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.यामुळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या वांघाचा तातडीने बंदोबस्त करावा या मागणीसाठी गिरड येथील शेकडो शेतकऱ्यांनी वनविभागाचे कार्यालय गाठून ३ तास ठिय्या आंदोलन करीत उपवनसंरक्षक हरबिंदर सिंग यांना निवेदन दिले.या वाघांना शेतशिवारातून हाकलून लावण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे याच्या प्रत्यक्ष मार्गदर्शन वन विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्यातरी वाघ मात्र शेतशिवार सोडायचे नाव घेत नाही.यामुळे शेतकऱ्याच्या शेतीच्या कामाचा खोळंब होत आहे.सध्या शेतामध्ये कपासीला फवारणी, खत टाकने,खुरपणीचे कामे जोरात सुरू आहे.मात्र शेतामध्ये वाघाचा वावर असल्याने शेतमजूर कामाला यायला तयार नाही.यामुळे शेत पिक कसे वाचवायचे हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.या वांघाचा बंदोबस्त करण्याच्या मागण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी गिरड येथील वनविभागाचे कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन केले.याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक हरबिंदर सिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांना कार्यालय गाठले.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी निवेदन देऊन या वांघाचा तातडीने बंदोबस्त करून भयमुक्त वातावरणात आम्हाला शेत करून द्या अशी मागणी केली.उपवनसंरक्षक हरबिंदर सिंग ,वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी वाघाला पडण्याचे आश्वासन दिले.यावेळी गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार विकास गायकवाड यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह वनविभागाचे कार्यालय गाठले. 

जर का ८ दिवसात वाघाचा बंदोबस्त झाला नाही तर उग्र आंदोलन करु असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.यावेळी सरपंच राजु नौकरकर, उपसरपंच मंगेश गिरडे, विलास लभाने पत्रकार, माजी सरपंच विजय तडस, मोहगांवचे सरपंच विलास नवघरे, ग्रामपंचायत सदस्य अमोल पर्बत,राहुल गाढवे, अरुण मोटघरे, प्रविण चुटे, सुनील गाठे, बलवंत गाठे, , हमीद पटेल,नरेंद्र मिश्रा,प्रभाकर चामचोर, संदिप शिवणकर, प्रविण ठाकुर आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी शेतमजूर उपस्थित होते.