रेल्वे विभागातील अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी संवेदीकरण कार्यशाळा

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर: बल्लारशाह रेल्वे विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी संवेदीकरण कार्यशाळेचे आयोजन मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट, रेल्वे स्टेशन बल्लारशाह येथे करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमत पानगनटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दशरथ सिंग स्टेशन प्रबंधक, बल्लारशाह हे होते. प्रमुख अतिथींमध्ये जे. श्रीनिवास कर्मदल नियंत्रक अधिकारी, विमलगिरी कल्याण निरीक्षक अधिकारी, एम. वेंकटेश मुख्य कर्मदल नियंत्रण अधिकारी, हितेश दउंडे स्वास्थ्य निरीक्षक अधिकारी, व्यंकटेश अण्णम, सचिव मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट, बल्लारशाह, निरंजन मंगरूळकर जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी, चंद्रपूर व भास्कर ठाकूर, पर्यवेक्षक, रेल्वे चाइल्डलाईन, बल्लारशाह यांचा समावेश होता.या कार्यशाळेत निरंजन मंगरूळकर यांनी एचआयव्ही एड्सची लक्षणे, होण्याची कारणे, काळजी घेण्याचे उपाय व तक्रार नोंदणीसाठी १०९७या टोल फ्री क्रमांकाची माहिती दिली. तर भास्कर ठाकूर यांनी १०९८ या बाल मदत टोल फ्री सेवा, महिला व बालविकास विभागाचे कार्य, बाल कल्याण समिती व जिल्हा बाल नियंत्रण कक्षाच्या कार्याबाबत मार्गदर्शन केले.हितेश दउंडे यांनी आरोग्य व स्वच्छतेबाबत माहिती दिली. विमलगिरी यांनी कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ परीक्षण व कल्याणकारी योजनांबाबत माहिती दिली. तर व्यंकटेश अण्णम यांनी स्वच्छतेत कर्मचाऱ्यांच्य योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.अध्यक्षीय भाषणात दशरथ सिंग यांनी अशा आरोग्य-जागृती व बालसंरक्षण कार्यक्रमांमुळे जनजागृती होऊन समाजहित साधले जाईल, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन भास्कर ठाकूर यांनी केले. तर आरोग्य कर्मचारी स्मिता काकडे टेक्निशियन, ग्रामीण रुग्णालय, बल्लारशाह यांनी आभार मानले. या कार्यशाळेत धर्मेंद्र मेश्राम, विजय अमर्थराज मिल्क्यू, देवेंद्र पिंपळकर आदींनी सहकार्य केले. या कार्यक्रमास रेल्वे स्वच्छता विभाग व वेंडर सह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.