धपकी गावात तलवार व चाकू घेऊन दहशत निर्माण करणारा युवक पोलिसांच्या जाळ्यात

नावेद पठाण मुख्य संपदाक
वर्धा वर्धा, दहेगाव गोसावी –दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी तालुका सेलू येथील मौजा धपकी गावातील आमरोडवर 26 वर्षीय मयुर गुलाबराव गलांडे (रा. धपकी) या युवकाने आपल्या मोटारसायकलला रस्त्याच्या मधोमध उभी करून हातात तलवार व चाकू घेऊन गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली.
ही माहिती मिळताच दहेगाव गोसावी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीस ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीकडून 1) लोखंडी तलवार (किंमत अंदाजे ₹500), 2) लोखंडी चाकू (किंमत ₹300), तसेच 3) हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. MH-32 L-7823 (किंमत ₹20,000) असा एकूण ₹20,800 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दहेगाव गोसावी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 0276/2025 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4, 25 अंतर्गत नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक मा. सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन यांच्या नेतृत्वात स. फौ. राजेश कंगाले, पो.हवा. आनंद भस्मे, पो.हवा. बम्हानंद मुन, पो.अं. अनिल चिलगर, पो.अं. निशांत कुटेमाटे व पो. भारत सातपुते यांनी केली.