जुने वादावरून मशिनटोला घाटटेमणी येथे लोखंडी तालवारने एकाचा निर्घृण खून

Thu 21-Aug-2025,09:08 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव

गोंदिया:आमगांव तालुका तील याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी २०.०० वा . दरम्यान मृतक विनोद देशमुख हा आपल्या फार्म हाऊस येथून निघून रात्री पर्यंत घरी परत न आल्याने ,मृतकची पत्नी व गावातील लोक हे मृतक चा शोध घेण्याकरिता गावाजवळील जंगल भागात गेले असता दिनांक 20/08/25 रोजी विनोद देशमुख घाटटेमणी जंगल परिसरात मृत अवस्थेत मिळून आला त्यास अज्ञात आरोपीतांनी अज्ञात कारणावरून कोणत्यातरी शस्त्राने डोक्यावर मारून गंभीर जखमी करुन जिवानिशी ठार केल्याने फिर्यादी हिरकणी विनोद देशमुख राहणार मशिन टोला घाटटेमणी हिचे तक्रारीवरून पोलीस ठाणे रावणवाडी येथे अपराध क्रमांक- ४५३/२०२५ कलम 103(1) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी हे घटना करून पसार झाले होते.सदर खून प्रकरण घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक,गोंदिया गोरख भामरे,यांचे सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांची ३ पथके नेमण्यात आलेली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने गुह्याच्या घटनास्थळी अत्यंत तत्परतेने भेट देऊन. गुन्ह्याची सखोल माहिती घेत घटना करुन पसार झालेल्या आरोपींची इत्यंभूत माहिती घटनास्थळ परिसरातील लोकांकडून गोळा करून अथक परिश्रम घेवून खुन करणारे आरोपी इसम नामे- १) प्रशांत उर्फ लोकेश छनुलाल कावडे वय २५ वर्ष २) कामेश चुन्नीलाल कावडे वय २८ वर्ष दोन्ही राहणार वॉर्ड क्रमांक ३,गिरोला तालुका आमगाव जिल्हा गोंदिया यांना मौजा कालीमाटी येथून ताब्यात घेण्यात आले.खून प्रकरण गुन्हयाचे अनुषंगाने नमूद आरोपीना सखोल चौकशी विचारपूस केली असता.आरोपीतांनी सांगितले की, मृतकने साथीदारांसह आरोपी प्रशांत याचे घरी जाऊन त्यास व त्याचे वडिलांना काठ्यांनी मारहाण केली होती याबाबत आमगाव पोलीस स्टेशन ला मृतक विरुद्ध गुन्हा सुद्धा नोंद आहे त्यानंतर मृताकासोबत वाद असल्याने त्यांचे आपसात पटत नव्हते व मृतक विनोद देशमुख हा नेहमी आरोपीतांचे गावात त्याचा वीटभट्टा असल्याने त्या गावात जात होता तेव्हा दोन्ही आरोपीना शिवीगाळ व धमकी देत होता. या कारणावरून दोन्ही आरोपींत्यांनी विनोद देशमुख याचा खून करण्याचा चार ते पाच दिवसापूर्वी कट रचून त्यांनी दिनांक १९/०८/२०२५ रोजी रात्री २१. ०० वाजता सुमारास गिरोला ते मशिनटोला कडे जाणाऱ्या डांबरी रोडवर विनोद देशमुख यास थांबवून चेहऱ्यावर लालमिर्ची पावडर टाकून लोखंडी तलवारीने डोक्यावर, पाठीवर, मानेवर मारून जीविनीशी ठार करून त्याचे प्रेत मृतकचेच मोटर सायकल ने बाघ नदी चे किनाऱ्याजवळ लंबा टोला गावाचे शिवारात झुडपी जंगलात मोटर सायकलसह टाकून दिले अशी दोन्ही आरोपीतांनी कबुली दिली आहे. दोन्ही आरोपीताना पुढील तपास कामी रितसर रावणवाडी पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे,अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे दिलेले निर्देश सूचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा तत्परतेने शोध घेवून आरोपींना गुन्ह्यात जेरबंद करण्याची कामगीरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरषोत्तम अहेरकर, पोउपनि शरद सैंदाणे , स.फौ.राजेन्द्र मिश्रा, पो.हवा. विठ्ठलप्रसाद ठाकरे, पो.हवा. राजकुमार खोटेले, पो.हवा. रियाज शेख, पो.हवा. सुजित हलमारे, पो.हवा. संजय चव्हाण, पो.हवा. महेश मेहर, पो.हवा. सोमेन्द्रसिग तुरकर,पो.हवा.दिक्षीतकुमार दमाहे, पो.हवा. सुबोधकुमार बिसेन, पो.हवा.प्रकाश गायधने, पो.हवा.इंद्रजित बिसेन, पो.हवा. भोजराज बहेकार,पो.शी.हंसराज भांडारकर, पो.शी संतोष केदार,पो शी राकेश इंदुरकर,पो शी दुर्गेश पाटील,मपोशी स्मिता तोंडरे,मपोशी कुमुद येरणे चापोहवा.लक्ष्मण बंजार,चापोशी राम खंदारे यांनी कामगिरी बजावली आहे.