बेरोजगारीला कंटाळून इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : बल्लारपूर शहरातील राजेंद्र वॉर्ड परिसरात राहणाऱ्या वसीम रफिक खान (३५) या ड्रायव्हरने बेरोजगारी ला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,वसीम खान हे ड्रायव्हरचे काम करत होते.मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांना स्थिर असे काम मिळत नव्हते.त्यामुळे ते नैराश्यात होते. याच काळात दारूचे व्यसनही वाढले होते.कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक संकटांचा ताण सहन न झाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.मृताच्या पश्चात पत्नी, ११ वर्षांची मुलगी व ८ वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील धांडे, पो हवा निकोडे करीत आहे.