राजुरा - गडचांदूर मार्गावर कापनगाव जवळ भिषण अपघात

Thu 28-Aug-2025,08:10 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर: राजुरा - गडचांदूर मार्गावरील कापनगाव जवळ राजुरा येथून पाचगाव कडे जाणा-या एका ॲटोला विरूध्द दिशेने येणा-या हायवा ट्रक ने जबर धडक दिली. या घटनेत 3 प्रवाशी जागीच ठार झाले एका महिलेचा राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात तर दोन महिलांचा रस्त्यात मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली असून एका गंभीर प्रवाश्याला चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले आहे. तर एकावर राजुरा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता ही दुर्देवी दुर्घटना घडली. राजुरा येथुन पाचगाव कडे ॲटो चालक व सात प्रवाशी ॲटो ने जात होते. राजुरा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर महामार्गाचे काम सुरू आहे. आज एकाएकी येथे काम करण्यासाठी रस्ता वाहतुकीत बदल करण्यात आला. मात्र याविषयी कसलेही फलक लावले नव्हते. यामुळे ॲटो चालक संभ्रमात पडला आणि हायवे वर ॲटो घेतल्यानंतर हायवा ट्रक ने ॲटोला भिषण धडक दिली. ही टक्कर एवढी भिषण होती की संपुर्ण ॲटोचा चुराडा झाला. यावेळी तिन प्रवाशी जागीच ठार झाले. तर एक राजुरात व तिन जखमींना चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर केल्यानंतर रस्त्यात दोघांचा मृत्यू झाला.या दुर्घटनेत रवींद्र हरी बोबडे, वय ४८, राहणार पाचगाव, शंकर कारू पिपरे, वय ५०, राहणार कोची, सौ. वर्षा बंडू मांदळे, वय ४१, राहणार खामोना, तनु सुभाष पिंपळकर, वय १८, राहणार पाचगाव, ताराबाई नानाजी पापुलवार, वय 60 वर्ष, राहणार पाचगाव आणि ऑटो चालक प्रकाश मेश्राम, वय ५० वर्ष, राहणार पाचगाव या सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात निर्मला रावजी झाडे, वय ५० वर्षे, पाचगाव यांना चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले असून भोजराज महादेव कोडापे, वय ४० वर्षे, भुुरकुंडा यांचे वर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजुरा पोलिसांनी याची दखल घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ट्रकचालक अद्याप फरार आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे रुग्णालयात आमदार.देवराव भोंगळे यांनी भेट दिली असून ठाणेदार सुमित परतेकी,,सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पवार व सहकारी पुढील तपास करी आहेत रुग्णालयात लोकांनी खूप गर्दी केली ग्रील या हायवेच काम करणाऱ्या कम्पनिवर व अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे असा आग्रह उपस्थितांनी धरला जनतेचा आक्रोश पाहून दंगा नियंत्रण पथकही बोलवण्यात आले एकाच वेळी 6 जण दगवल्याने जनतेत आक्रोश दिसत असून तणावपूर्ण शांतता राजुरात दिसत आहे.