जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्या महिलेला केले हद्दपार

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:सण-उत्सव शांततेत पार पडावे याकरिता पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. याअंतर्गत अवैधरीत्या दारू विक्री करण्याचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या चाणकी (कोरडे) येथील महिलेला एक महिन्याकरीता जिल्ह्यातून अल्लीपूर पोलिसांनी हद्दपार केले.दीक्षा महेंद्र थूल (३०, रा. चाणकी कोरडे) असे दारू विक्रेत्या महिलेचे नाव आहे. या महिलेविरोधात अल्लीपूर पोलिस ठाण्यात दारू विक्री व बाळगणे असे अनेक गुन्हे दाखल आहे त्यामुळे ठाणेदार विजयकुमार घुले यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५६ अन्वये प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी हिंगणघाट यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी या महिलेला जिल्ह्याच्या हद्दीतून एक महिन्याकरिता हद्दपार करण्याचे आदेश दिले. यावरून अल्लीपूर पोलीसांनी महिलेला यवतमाळ जिल्हातील राळेगाव येथे एक महिन्याकरीता हद्दपार करून सोडून देण्यात आले.ही कारवाई अल्लीपूर येथील ठाणेदार विजयकुमार घुले, अंमलदार रवी वर्मा, अजय रिठे, योगेश चंदनखेडे यांनी केली.